तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

बातमी कट्टा:- हतनूर धरणाचे 28 दरवाजे 1 मीटर उंचीने उघडण्यात आले असून 42 हजार 378 क्यूसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात पाणी प्रवाह सोडण्यात येणार असल्याने तापी नदीची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे 1 दरवाजे दीड मीटरने मीटरने उघडून 4 हजार 891 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे एक मीटरने उघडून 6 हजार 827 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो.

तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: