
बातमी कट्टा:- मायलेकाची तापी नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना दि 16 रोजी दुपारी घडली होती.आपल्या दहा वर्षाच्या मुलासोबत सासरवाडी येथे जात असतांना गिधाडे तापी नदीपात्रात उडी घेतल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत होते.घटनास्थळी शोधकार्य सुरु असतांना दि 16 रोजी सायंकाळी महिलेचा मृतदेह तापीत आढळून आला होता मात्र मुलाचा शोध सुरु होता.घटनेच्या तिसऱ्या दिवशी आज दि 18 रोजी सकाळी त्या मुलाचा मृतदेह पाण्यात आढळला आहे.

शिरपूर तालुक्यातील वाडी बु. येथील योगीताबाई रवींद्रसिंग राजपूत वय 30 या काही दिवसांपासून आपल्या दहा वर्षीय मोठा मुलगा तेजेंद्र रविंद्रसिंग राजपूत याच्या सोबत माहेर शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे आले होते. दि 16 रोजी सकाळी योगीताबाई रविंद्रसिंग राजपूत या आपल्या मुलासोबत डोंगरगाव शहादा येथून सासरी शिरपूर तालुक्यातील वाडी बु.येथे येण्यासाठी निघाले होते. मात्र योगिताबाई आपल्या तेजेंद्र मुलासोबत गिधाडे तापी पुलावर आले त्यांच्याकडे असलेली बॅग व चपल्ला पुलावर सोडून दोघांनीही तापी नदीत उडी घेतली.यादरम्यान महिला व एका लहान मुलाने तापीत उडी घेतल्याचे एकाने बघितले. तर बॅग मधील वहीवर लिहीलेले नाव मोबाईल नंबरने मायलेकांची ओळख समजली.

घटनेची माहिती सर्वत्र समजताच योगीताबाई यांचे नातेवाईक गिधाडे पुलावर दाखल झाले तर वाडी बु.येथील नातेवाईक दाखल होऊन तापी नदीपात्रात मच्छीमारांच्या मदतीने शोध मोहीम सुरु केली.दुपारपासून सुरु असलेल्या शोध मोहीम नंतर दि 16 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मयत योगीताबाई यांचा मृतदेह मिळुन आला होता मात्र मुलगा तेजेंद्र याचा सायंकाळी शोध लागलेला नव्हता.
सावळदे ते गिधाडे दरम्यान मच्छीमारांच्या मदतीने शोध सुरु रोज शोध घेणे सुरु होते.आज दि 18 रोजी सकाळी तेजेंद्र याचा मृतदेह सावळदे व गिधाडे पुलांच्या मध्यभागी आढळून आला असून त्याचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.