ती मला माफ करेल का ? पळासनेर अपघातातील पत्रकाराने अनुभवलेल्या वेदना…

पत्रकार प्रशांत परदेशी यांच्या अधिकृत फेसबुक वरील पोस्ट

वेळ दुपारी तीन वाजेची… मी आणि अमोल शिरपूर तालुक्यातल्या कोळशापाणी पाड्यावर पोहोचलो. सर्वत्र रडण्याचा आवाज. गावात मरण शांतता पसरलेली. हा पाडा पळासनेर पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेला. सुरुवातीचे तीन किलोमीटर कच्चा पक्का रस्ता आणि पुढे माती रस्ता…. असे या गावाला पोहोचण्याच स्वरूप. पळासनेर येथे झालेल्या अपघातात या पाड्यातील पाच कुटुंबांना हादरा बसलेला. करती माणसं आणि उमलणारी कोवळी बालकं या अपघातात मृत्युच्या कुशीत विसावली. त्यांच जाणं अचानक … आता होते आणि आता नाही… पाड्यातील ही मरणासन्न अवस्था जीवाला चटका लावणारी… घटनेची माहिती मिळताच आजूबाजूची सर्व चित परिचीत माणसं बाया मयताच्या कुटुंबाचे सांत्वन करायला आलेली… घरा घरा समोर हंबरडा फोडणार्या महिला… अंगणात बसुन रडणार्या महिला पळासनेर अपघाताने दिलेल्या चटक्याची साक्ष देत होत्या. हंबरडा फोडणार्या महिलांचा आवाज वातावरण अधिक भयाण करत होता. मी या पाड्याला कधी आलो नाही की कोणी परिचित ही नाही, तरी ती दृश्य मला ही विचलित करत होते.

पाड्यात पाच जणं मयत झाल्याची माहिती जमा करण्यासाठी आम्ही दोघं राज या स्थानिक मुलाला सोबत घेऊन, अवघ्या 235 घरांच्या पाड्यात, मयत झालेल्या कुटुंबाच्या भेटी घेऊन माहिती घेत होतो. एक गल्ली सोडली आणि दुसर्या गल्लीत वळताच ती दिसली.

अवघ्या सहा सात वर्षांची ती. घराबाहेर एकटी उभी राहून रडत होती. घरात ती एकटी आणि आई आणि भावाबद्दल वाईट कानावर पडत असल्याने बिथरून रडत उभी. मी राजला विचारले, ही का रडते आहे? राज बोलला तीचा भाऊ देखील अपघातात दगावला असल्याची माहिती आहे. आई भावाला सोडायला पळासनेरला गेली. ती आणि भाऊ सोबत अपघाताचे शिकार झाले. मी सुन्न झालो. बाप आधीच वारलेला. आई मुलाचा सांभाळ करतेय, आता भाऊ पण गेला असेल आणि आई जखमी असेल तर तीला शोधु कुठे? या प्रश्नाने तीला सैरवैर केल होतं. जखमी आई कुठे उपचार घेत असेल, भाऊ पुन्.आ भेटेल का? हे मनातले प्रश्न कोणाला विचारू या भयाने ती घराबाहेर दारापासुन काही अंतरावर उभी राहुन रडत होती. तीच रडणं काळीज जिरून जात होतं. ती कोणालाही काही न विचारता एकटी रडत होती.

देवाने या वयात हे दुःख तिला दिल. रडायला कुणाचा खांदा नाही की, रडू नको सर्व ठीक होईल असं सांत्वन करायला कोणी नाही. मी पण काही बोलु शकलो नाही, काय ही अवस्था?. अशाही परिस्थितीत मी बातमीसाठी शुट करतिलाल होतो, मी तिच्या जगण्याला कॅमेर्यात कैद करत होतो, हे पाहुन तिला काय वाटत असेल, माझ्या या चुकीबद्दल ती मला माफ करेल का? हा प्रश्न मला सातवतो आहे. बातमीसाठीच शूटिंग करत असतांनाच तिच्या दुःखचा एक एक पापुद्रा उलगडत होता आणि माझे हात थरथरत कापत होते. मी शूटिंग बंद केले. मला लाज वाटत होती, मी तिच दु:ख दुर करू शकत नव्हतो.

देव इतका कठोर का होतो? हा प्रश्न मला सतावत आहे. एक मुलगी इतकी अनाथ आणि अबोध असतांना तीला कोणी सावरायला नसावं?

तीला भेटून आता काही तास लोटले आहेत.. पण पोरकी.. एकटी ती मला अजुनही निष्प्रभ असल्याची जाणीव करून देत आहे. तीचं दुःख मी वाटू शकलो नाही यासाठी तीनं मला माफ करावं.प्रशांत परदेशी पत्रकार धुळे

Amol rajput 9404560892

WhatsApp
Follow by Email
error: