बातमी कट्टा:- 2013 पासून होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या शिरपूर येथील दोघांना पोलीस भरतीत यश प्राप्त झाले असून त्या दोघांचा आज शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला.

शिरपूर होमगार्ड पथकातील नरेश भानुदास चौधरी रा.शिरपूर व किरण कचरू जाधव रा.शिरपूर हे दोन्ही 2013-14 साली होमगार्ड म्हणून भरती झाले होते.होमगार्ड पथकात त्यांची उल्लेखनीय कामगिरी होती.त्यांनी 2018-2019 साली पोलीस भरती सहभाग घेतला होता.त्या भरतीचा नुकताच निकाल जाहीर झाला असून पोलीस म्हणून दोघांचीही निवड झाली आहे. दोघांचा आज दि 18 रोजी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात होता.पोलीस निरीक्षक रविंद्रजी देशमुख,सा.पोलीस निरीक्षक गणेशजी फड, उपनिरीक्षक संदीपजी मुरकुटे समादेशक अधिकारी, होमगार्ड सुभाष एम.लोहार यांनी शाल श्रीफळ व गुलाब पुष्पगुच्छ देऊन दोघांना गौरविण्यात आले त्यांच्या भावी पोलीस ट्रेनिंग सेवेसाठी वरील उपस्थीतीत मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
