बातमी कट्टा:- दोंडाईचा येथे मागील सात दिवसापूर्वी सांयकाळच्या सुमारास उड्डाणपुलावर लाईट बंद असल्या कारणाने अँपे-रिक्षा व हिरो होंडा कंपनीच्या युनिकॉन दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात भजनलाल एन सन्स ह्या फर्मचा मालक निखील ग्यानचंद केसवाणी (वय २६ वर्षे) यांच्या डोक्याला, हाताला, पायाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होता. पहिल्या दिवशी डोक्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येकाला वाटत होते की, आता पाच-सहा महिने उशिराका होईना निखील पुर्ववत शुद्धीवर येईल. मात्र आज सात दिवसानंतर मुत्यूशी झुंज देत,अखेर निखीलचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या ह्या अपघाती निधनाने केसवाणी परिवारावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. पथदिवे, गतिरोधक सुरक्षित मोटरसायकल-पायवाट अभावी मागील वर्षभरात ह्याच रस्त्यावर चार बळी गेले असुन, अजुन हा दोंडाईचा-शहादा उड्डाणपूल किती जणांचा बळी घेईल, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारू लागले आहे. प्रशासन ह्या घटनेकडे जातीने लक्ष देईल की नाही, असेच अपघाती मुत्यूच्या घटना घडत राहतील, अशीही शंका आता सर्वसामान्य दैनंदिन ह्या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना येत आहे.

येथे दि. १९ जुलै सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता दोंडाईचा-शहादा उड्डाणपुलावर निखील ग्यानचंद केसवाणी (वय २६) याचा मोटरसायकल क्रमांक (एम.एच.१८-ए.क्यु-३६७४) चा समोरून लाईट बंद असलेल्या व जोरात येणाऱ्या रामी येथील अँपे-रिक्षा क्रमांक (एम.एच.१८-एल-२८) सोबत भीषण अपघात झाला. यात घटनास्थळी अँपे-रिक्षाचालक यास कोणतीही इजा न होता. त्याने तेथुन पळ काढला. तर निखील केसवाणी यास डोक्यावर गंभीर इजा झाली होती. तसेच एक हात व पाय पँक्चर झालेला होता. त्याला तातडीने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरोटे यांनी धुळे येथे हलविण्याचे सांगितले. म्हणून मागील सहा- सात दिवसांपासून निखीलवर धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पीटलला उपचार सुरू होते. त्यात डोक्याचे पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यांनतर हळूहळू त्याच्यात सुधारणा झाल्यावर पुढील शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र आज सकाळी मुत्यूशी झुंज देत, अखेर निखिलचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दोंडाईचा-शहादा उड्डाणपुलावर वर्षभरात चौथा बळी….

वर्षभरात दोंडाईचा-शहादा उड्डाणपुलावर अनेकांचा अपघात होत,चार जणांचा बळी गेला आहे. मागील वर्षी सिंधी कॉलनीतील ज्येष्ठ व समाजसेवक कै. राधेश्याम जयसिंघानी हे नेहमीप्रमाणे दुपारी जेवण करून दुकानावर येत असताना, उड्डाणपुलावर मागुन येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जोराने धक्का दिला. त्यात ते जागीच गतप्राण झाले. तसेच दोन महिन्यापुर्वी दोंडाईचा येथील माहेर असलेली बागवान समाजाची मुलगी आपल्या पती सोबत शहादाहून येत असताना, दोंडाईचा उड्डाणपुलावर मागुन येणाऱ्या दहा चक्का ट्रालाने धडक दिल्याने माणसाच्या जागीच चेंदामेंदा झाला होता. तर महिलेने धुळे नेत असताना रस्यात जीव सोडला. त्यानंतर आज चौथा निखील केसवाणीचा जीव गेला. नियमित ह्या उड्डाणपुलावर अपघाताच्या घटना घडत असल्याने व नागरिक आपला जीव गमावत असताना. नागरिकांचा रोष वाढण्या अगोदर प्रशासनाने तातडीने दखल घेत उपाययोजना करायला हव्यात, अशा चिंताजनक अपेक्षा नागरिक प्रशासनाकडे व्यक्त करत आहेत.