बातमी कट्टा:- चिमुकल्याला आपल्या आईने सोडून दिल्याची घटना घडली आहे.त्या अनाथ चिमुकल्याचे आई वडील कोण याबाबत त्याला काही सांगण्यात येत नाही.गेल्या एक महिन्यांपासून तो अनाथ म्हणून एका जिम जवळ राहत होता.त्याला सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या घरात आधार दिला मात्र कायदेशीर रित्या त्याला घरी ठेवणे शक्य होणार नसल्याने पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला.त्याला महिला व बालविकास विभागाकडे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.त्याची दिवाळी तरी घरी करु द्यावी अशी ईच्छा सामाजिक कार्यकर्त्या ममता देशमुख यांनी व्यक्त केली आहे.मात्र याबाबत नेमका काय निर्णय लागेल ? त्याची दिवाळी कुठे होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरातील करवंद रोड वरील एका जिम बाहेरील कोपऱ्यात महिन्याभरापूर्वी तीन ते चार वर्षाचा मुलगा राहत असल्याचे समजले.त्याला बोलता येत असल्याने त्याने स्वताचे नाव रुपेश असे सांगत आईने सोडून दिल्याचे सांगत होता.त्याला पुर्णता गावाचे नाव वगैरे काही एक सांगता येत नव्हते.जिम मधील तरुणांकडून त्याला खाण्याची व्यवस्था व कपडे वगैरे देण्यात येत होते. मात्र एक महिन्यांपासून त्याला घेण्यासाठी कोणी येत नसल्याने तरुणांनी याबाबत आमोदे येथील समाजिक कार्यकर्त्या ममता देशमुख यांंना रुपेश बाबत माहिती दिली. गेल्या एक महिन्यांपासून तीन ते चार वर्षांचा अनाथ निरागस चिमुकला आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ ममता देशमुख या रूपेश कडे गेल्या.त्याला त्याची विचारपूस केली त्याने आहिराणी भाषेत फक्त स्वताचे नाव रुपेश सांगीतले तर आईने सोडून दिले असल्याचे सांगितले.
एका कोपऱ्यात अनाथाप्रमाणे राहणाऱ्या रुपेशला अखेर ममता देशमुख यांनी सोबत घेतले त्याला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात तपासणी साठी आणले.त्याला घरी नेले.नवीन कपडे घेतले.पोलीसांना याबाबत माहिती दिली.रुपेशला घरी घेऊन गेल्यानंतर त्याला आईची माया मिळाल्याने तो घरी त्यांच्या कुटुंबात रमला.मात्र कायदेशीर रित्या त्याला धुळे येथील महिला व बालविकास विभागात दाखल करावे लागणार असल्याने रुपेशला घेऊन ममता देशमुख या पोलीस स्टेशनसाठी निघाल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच रुपेशने जोरजोरात रडून मला तुझ्या सोबतच रहायचे मी कुठेच जाणार नाही असे हुंडके देत बोलून पोलीस स्टेशन बाहेरच थांबला.एक तासापर्यंत त्याला समजवले मात्र रुपेश समजण्याचा पलिकडे होता.अखेर त्याला पुन्हा ममता देशमुख घरी घेऊन गेल्या व एकट्या येऊन पोलीसांना भेटून दिवाळी पर्यंत तरी रुपेशला आमच्याकडे राहुद्या अशी विनंती केली.मात्र याबाबत महिला बालकल्याण विभाग निर्णय घेऊ शकेल असे सांगण्यात आले रुपेशचे चांगल्या बोलणे वागण्यामुळे ममता देशमुख यांना देखील त्याचा जिव्हाळा लागला होता.मात्र रुपेशची दिवाळी नेमकी आता कुठे होईल याकडे लक्ष लागले आहे.