बातमी कट्टा:- धुळे शहरातील कचरा संकलनाचा ठेका घेतलेल्या स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकावर धुळेकरांचा अवमान केल्याचा आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक व अंडे फेक केली.याप्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://youtu.be/8LYlQrhE12A
धुळे शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी धुळे महानगरपालिकेने स्वयंभू कंपनीला दिली आहे. शहरातील बहुतांश भागात रस्त्यावर कचराक्षपडलेला असतो.शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलले आहे. याबाबत धुळे येथे स्वयंभू कंपनीचे व्यवस्थापक अभिजित फडतरे यांच्या कार्यालय बाहेर राष्ट्रवादी पक्षकाचे महानगरप्रमुख रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.यावेळीप्रश्न व्यवस्थापक आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकाच्या अंगावर शाही आणि अंडे फेकत निषेध व्यक्त केला.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://youtu.be/8LYlQrhE12A
राष्ट्रवादी पक्षाचे रणजितराजे भोसले यांच्या सांगण्यानुसार शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे याबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता व्यवस्थापक फडतरे यांनी धुळेकारांबाबत अवमानजनक शब्द वापरल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापक फडतरे यांच्या अंगावर शाही व अंडे फेक केले.नागरिकांच्या हिताचे प्रश्न उपस्थित केले म्हणून प्रशासन आमच्यावर गंभीर गुन्हे दाखल करत आहे.ही हुकूमशाही असल्याचा आरोप रणजीतराजे भोसले यांनी केला आहे.
याप्रकरणी व्यवस्थापक अभिजित फडतरे यांनी शहर पोलीस स्टेशनात फिर्याद दाखल करत राष्ट्रवादीचे रणजीतराजे भोसले यांच्या सह राष्ट्रवादीचे ८ ते १०जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://youtu.be/8LYlQrhE12A
