बातमी कट्टा:- भरधाव केमिकल टँकरचे नियंत्रण सुटल्याने टँकर गतीरोधकवरुन पुढील कंटेनरला जाऊन धडकत टँकर पलटला व आगीने भडका घेतला.चार तासाच्या या आगीत टँकरसह कंटेनर मध्ये वाहतूक होत असलेले सात नवीन ट्रॅक्टर्स व कंटेनरची राखरांगोळी झाली.यात टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला.या भीषण अपघातात सुमारे अंदाजे 1 कोटीपेक्षाही जास्तीचे नुकसान झाले आहे.

दि 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शेंधवाकडून शिरपूरकडे भरधाव जाणाऱ्या टँकरचा पळासनेर गावानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर गतिरोधकवरून समोर चालणाऱ्या कंटेनरला जाऊन धडकत टँकर पलटी झाला.या टँकरमध्ये सल्फ्युरीक ऍसिड असल्याने आगीने भडका घेतला.या अपघातात आगीने रौद्ररूप धारण केले होते.यात चालकाचा देखील आगीत होरपळून मृत्यू झाला.भीषण आग असल्याने मदतकार्य करता येत नव्हते.यात टायरचा फुटण्याचा जोरजोराने आवाज येत होता.वाहतूक थांबवण्यात आली होती.टँकरने ज्या कंटेनरला धडक दिली त्या कंटेनर मधून नवीन जॉन डिअर कंपनीचे सात ट्रॅक्टर घेऊन जात होते.या आगीत टँकरसह,कंटेनर व कंटेनर मधील नवीन सात ट्रॅक्टर जळून खाक झाले.या आगीत टँकरचा चालकाचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला.यामुळे चालकाची ओळख पटली नव्हती.सुमारे चार तास पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.
घटनास्थळी पोलीसांसह नागरीकांनी धाव घेतली होती. टँकरच्या क्रमांकावरुन चालकाची ओळख पटवण्यास सांगवी पोलीसांना यश प्राप्त झाले.तामिळनाडू येथील सेल्वम समुथिरामायण अस चालकाचे नाव आहे. तामिळनाडू येथून केरळ राज्यात सल्फ्युरीक ऍसिड घेऊन जात असतांना टँकरचा अपघात झाला. यात एकुण अंदाजे एक कोटी पेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे.