बातमी कट्टा:- विज कोसळून मृत्यू झालेल्या दोन जणांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 4 लाख प्रमाणे 8 लाखांचा धनादेश त्यांच्या पत्नींना देण्यात आला आहे.शासनाकडून मदत देण्यात आली असून तहसीलदार,जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदारांच्या अहस्ते हा निधी देण्यात आला.
शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथे दि 10 जुलै रोजी निंबाच्या झाडावर विज कसळली होती.यात झाडाखाली असलेल्या चार जणांवर विज कोसळली होती यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.शासनाकडून आता या दोन्ही मयतांच्या पत्नींना प्रत्येकी 4 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
आज शिरपूर तहसील कार्यालय येथे जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे,आमदार काशिराम पावरा व तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते कुरखळी येथे विज कोसळून मयत झालेले मनोज सुकलाल कोळी यांची पत्नी श्रीमती मनोज सुकलाल कोळी व मयत सुनिल सुदाम भिल यांची पत्नी श्रीमती मायाबाई सुनिल भिल यांना प्रत्येक चार लाखांचा धनादेश असा एकुण 8 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील तहसीलदार आबा महाजन यांनी प्रत्यक्ष ताजपूरी येथे जाऊन विज कोसळून मयत झालेले गोपीचंद सनेर यांच्या पत्नीकडे चार लाखांचा धनादेश सुपुर्द केला होता.