थाळनेर परिसरात चालय तरी काय ? वरिष्ठ पोलिस अधिकारींनी लक्ष देण्याची गरज..

बातमी कट्टा:- थाळनेर परिसरात चोरी घरफोडी वाढती गुन्हेगारीवर पोलिसांचे वचक राहिलेले नसल्याचे दिसून येत आहे.नुकतेच पोलिस निरीक्षक के.के.पाटीलांनी शिरपूरचा पदभार स्विकारला आणि शहर पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारींवर वचक बसवला निरीक्षक के.के.पाटीलांनी करून दाखवले पण मात्र थाळनेर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गुंडशाही असेल किंवा चोरांचा धुमाकूळ यावर पोलिसांचा कुठलाच धाक राहिलेला नाही. याकडे वरीष्ठ पोलिस अधिकारींनी लक्ष देणे गरजेचे आहे.

धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर धुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसाय असो किंवा वाढती गुन्हेगारी यावर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरु झाल्या.कुल्याच गुन्हेगारांना मोकळा न सोडता तडीपार देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहेत. यानंतर शिरपूरात देखील पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली.

मात्र थाळनेर पोलिस स्टेशन हद्दीत काही वेगळेच चित्र बघायला मिळत आहे.येथील गुन्हेगारी इतकी वाढली की चक्क अवैध व्यवसायीक लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले होतांना दिसत आहे.चोरीच्या घटना या परिसरात विशेष राहिलेले नाही.सर्वत्र अवैध व्यवसायांवर कारवाई होत असतांना थाळनेर हद्दीत अवैध व्यवसाय कोणाच्या आर्शिवादाने सुरू होते.बर त्याबाबतीत थाळनेर पोलिसांना कदाचित माहिती नसावी मग लोकप्रतिनिधींनी गावात अवैध व्यवसाय सुरू असल्याचे सांगून त्यावर का कारवाई करण्यात येत नाही. उलट या लोकप्रतिनिधींनी अवैध व्यवसायाची माहिती पोलिसांना दिली व विरोध केला म्हणून लोकप्रतिनिधीच्या घरांवर हल्ले करण्यापर्यंत इतकी दहशत या गुन्हेगारांची कोणामुळे होते.आणि गुन्हे दाखल असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने संशय उपस्थित होत आहे.

या गुन्हेगारांना कोण आश्रय देत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.थाळनेर परिसरात घरफोडी, चोरी व वाढती गुन्हेगारी वेळीच रोखण्यात आली नाही तर भविष्यात या थाळनेर पोलीस स्टेशन हद्दी मोठी जिवीत हाणी किंवा दुर्घटना घडू शकते हे नक्की ! वरीष्ठ अधिकारींनी यावर गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले होऊन आरोपी मोकाट फिरत असतील तर यापेक्षा दुर्दैव काही म्हणता येणार नाही.

WhatsApp
Follow by Email
error: