दरणे येथील खून प्रकरण,तीन संशयितांना पोलीसांनी घेतले ताब्यात,दि 11 रोजी पर्यंत पोलीस कोठडी…

बातमी कट्टा:- पोळा सणाच्या दिवशी प्रेमसिंग गिरासे हे मित्रांसोबत नवीन मोटरसायकल घेण्यासाठी गेले होते नवीन मोटरसायकल घेऊन परत येत असतांना जुनी मोटरसायकलीने दोन्ही मित्र डबलशीट बसून पुढे निघुन गेल्यानंतर प्रेमसिंग गिरासे नवीन मोटरसायकलीने जात असतांनाच रस्त्यावर धारदार शस्त्राने प्रेमसिंग यांचा खून करण्यात आला. याबाबत प्रेमसिंग यांचे मित्र जगदिश परमार याने फिर्याद दिली असून त्यात खलाणे येथील तीन संशयीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तिघांनाही रात्री ताब्यात घेतले असून आज दि 7 रोजी मा. न्यायालयात हजर केले असता दि 11 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मयत प्रेमसिंग यांचा मित्र जगदिश जयसिंग परमार रा.दरणे यांनी फिर्यादीत म्हटले की,दि 6 रोजी प्रेमसिंग राजेंद्रसिंग गिरासे, जगदिश जयसिंग परमार वय 23,समाधान इश्वरसिंग गिरासे,असे तिघे ही जण शिंदखेडा येथील पाटण चौफुली येथील बजाज शोरुम येथे नवीन प्लँटीना मोटरसायकल घेण्यासाठी गेले होते.दुपारी 2 वाजेच्या सुमारास 24 हजार 900 रुपये डाउंटपेमेंट देऊन नवीन मोटरसायकल ताब्यात घेतली व नवीन मोटरसायकल प्रेमसिंग यांनी चालविण्यास घेतली आणि जगदीश परमार व समाधान गिरासे हे दुसऱ्या मोटरसायकलीवर डब्बलशीट बसले त्या नंतर दुपारी शिंदखेडा येथील गरीमा शोरुम येथे जूनी मोटरसायकल सर्विसिंग साठी घेऊन गेले तेथे उशीर लागत असल्याने तेथे न थांबता ते दराणे गावाकडे जाण्यासाठी निघाले.

प्रेमसिंग गिरासे यांचे नविन मोटरसायकल मध्ये पेट्रोल कमी असल्याने प्रेमसिंग गिरासे हे कुमरेज फाट्याजवळील महाविर पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकण्यासाठी थांबले त्यावेळी जगदीश परमार व समाधान गिरासे दोघेही डब्बलशीट जुनी मोटरसायकलीने शिंदखेडा चिमठाणे रोडने पुढे निघुन गेले. त्यावेळी 3 वाजेच्या सुमारास प्रेमसिंग गिरासे यांचा समाधान यांच्या मोबाईल वर फोन आला त्यावेळी तुम्ही कुठं पर्यंत गेले आहेत मी तुमच्या मागे आहे असे संभाषण केले. जगदीश परमार व समाधान गिरासे हे मोटरसायकलीने पुढे जात होते त्यावेळी प्रेमसिंग गिरासे त्यांच्या मागे येत होता.चिमठाणे चौफुली जवळ असतांना जगदीश परमारने मोटरसायकलीच्या आरश्यात पाहिले त्यावेळी प्रेमसिंग गिरासे हा मागे येत असल्याचे दिसत होते.तेथून जगदीश आणि समाधान पुढे निघुन गेले.

जगदीश व समाधान दराने गावात पोहोचले तेव्हा प्रेमसिंग गिरासे मागे दिसत नसल्याने समाधान याने मोबाईलने प्रेमसिंग याच्या मोबाईल वर फोन केला परंतु त्याचा फोन लाग नव्हता यावेळी गावात असतांना गावातील एका महिलेने सांगितले की,प्रेमसिंग याच्यावर कोणीतरी वार केला असून प्रेमसिंग सोनगिर दोंडाईचा रस्त्यावर चिमठाणे सबस्टेशन जवळ असून नवीन मोटरसायकल व मोबाईल घेऊन संशयित पसार झाल्याची माहिती दिली.जगदीशसह समाधान व गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी प्रेमसिंग याला चिमठाणे येथील सरकारी रूग्णालय व तेथून सोनगीर येथील रुग्णालयात घेऊन गेले असल्याची माहिती मिळाल्याने सर्वजण सोनगीर येथे पोहचले तेथे प्रेमसिंग याला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.प्रेमसिंगच्या दोन्ही छातीच्या मध्यभागी व पायाच्या मांडीवर दोन ठिकाणी तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने संपूर्ण कपडे रक्तबंबाळ झाल्याचे दिसले.

शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील शाम युवराज मोरे,राकेश रोहिदास मोरे व संदिप फुलचंद पवार या तिघांनी जी.जे 05,ई के 5556 क्रमांकाच्या पल्सर मोटरसायकलीने येऊन प्रेमसिंग गिरासे याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे जगदीश परमार याने फिर्यादीत म्हटले आहे.या तिघांच्या विरुध्द 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी त्यांचा शोध सुरु करत काही तासात त्या तिघांनाही रात्री शिताफीने तात्काळ ताब्यात घेतले. आज दि 7 रोजी शिंदखेडा मा.न्यायालयात हजर केले असता तिघांनाही 11 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: