बातमी कट्टा:- कपडा दुकानावर काम करुन घराचा उदरनिर्वाह होत असतांना लग्न झाले आणि संसाराचा प्रपंच वाढला.यामुळे दुसऱ्याकडे काम न करता स्वताचा व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न केला पत्नी आणि आईच्या मदतीने वेफर्स बनविण्याचे ठरवले आणि हळूहळू ते बनवत असलेल्या केळी आणि बटाटे वेफर्सची शिरपूर तालुक्यासह मुंबई, पुणे नाशिक तर मध्यप्रदेशच्या इंदौर पर्यंत चव पोहचली.

ही कहाणी आहे शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील सुभाष कोळी या तरुणाची ! सुभाष कोळी हे त्यांच्या विवाहपूर्वी शिरपूर येथील कपड्यांच्या दुकानात कामाला होते.अनेक वर्ष ते कपड्यांच्या दुकानात काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते.मात्र सुभाष कोळी विवाह बंधनात अडकले आणि त्यांचा संसाराचा प्रपंच वाढला.आणखी किती वर्ष दुसऱ्याकडे कामाला जावे म्हणून त्यांनी घरात आई आणि पत्नी यांच्याकडे नवीन व्यवसाय सुरु करण्याबाबत विषय केला. आई आणि पत्नी दोघांनी तात्काळ स्वताचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पाठिंबा दर्शविला आणि केळीच्या व्यवसाय पासून वेफर्स बनवण्याचा व्यवसायाला सुरुवात केली.

गरमागरम वेफर्स बनवतांना बघून ग्राहकांची गर्दी वाढली. यासाठी पत्नी आणि आई यांची देखील मदत मिळत होती. जळगाव जिल्ह्यातून कच्ची केळी आणून त्या केळीचे वेफर्स बनविण्यास सुरुवात केली.या वेफर्सची चव उत्तम असल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आणि शिरपूर तालुक्यासह मुंबई ,पुणे नाशिक सह मध्यप्रदेश च्या इंदौर कडे जाणाऱ्या येणाऱ्या कित्येकांना या वेफर्सची भुरळ पडली.मेट्रो सिटींमध्ये महागडे वेफर्स घेण्यापेक्षा स्वस्तात वेफर्स घेऊन जण्यात पसंती वाढली.केळी सोबतच बटाटे वेफर्सची सुरुवात सुभाष कोळी यांनी केली आहे या बटाटे वेफर्सला देखील पसंती मिळु लागली.मध्यप्रदेश येथून वेफर्स साठी लागणार्या विशेष बटाटे आणून त्यांचे वेफर्सची सुरुवात करण्यात आली.
स्वताचा व्यवसाय सुरु करण्याच्या निर्णयाला आई आणि पत्नी यांनी सकारात्मकता दाखवल्याने स्वयंरोजगाराचे स्वप्न साकार झाल्याचे सुभाष कोळी यांनी सांगितले.सुभाष कोळी यांच्या श्री साईकृपा वेफर्स शिरपूर शहरातील रिक्वेशन गार्डन समोर आहे.एकवेळा अवश्यक भेट द्या आणि वेफर्स कसे होते नक्की कळवा !
Facebook व्हिडीओ साठी लिंक क्लिक करा
https://www.facebook.com/batamikatta?mibextid=zLoPMf

व्हिडीओ बघण्यासाठी फेसबुक लिंक क्लिक करा
https://www.facebook.com/batamikatta?mibextid=zLoPMf