बातमी कट्टा:- पैशांच्या वादातून एका 35 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून शुक्रवारी घटना उघडकीस आली आहे.गळा चिरुन हत्याची घटना घडल्यामुळे यामुळे शहर हादरले आहे.मध्यरात्री खूनाचा थरार घडला असून दुसऱ्या दिवशी घटना उजेडात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या हाशिमजी प्रेमजी व्यापारी संकुलात आज सकाळी नेहमीप्रमाणे नगरपालिकेचे सफाई कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेलेले होते. त्यांना एक तरुण त्याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी प्राथमिक चौकशीत मयत तरुणाची ओळख पटवली. गांधलीपुरा भागातील रहिवासी असलेला प्रकाश दत्तु चौधरी या 35 वर्षीय तरुणाची
पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असून, ती शुक्रवारी सकाळी उजेडात आली.या घटनेमुळे अमळनेर शहर हादरले आहे.
घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. त्यात प्रकाश चौधरी याची हत्या पैशांच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे..संशयित आरोपी हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.