धुळे जिल्ह्यातील लसीकरणाची काय आहे परिस्थिती ? जाणून घ्या…

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत होते आणि कोरोना आता जिल्ह्यातून हद्दपार देखील केला आहे.धुळे जिल्ह्यात दि 16 जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात आतापर्यंत किती लोकांनी लसीकरण केले व जिल्हा आरोग्य विभागाचा लसीकराचा पुढील अजेंडा हे जाणून घेऊ.

व्हिडीओ वृत्तांत

धुळे जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांनी दिलेल्या माहिती नुसार धुळे जिल्ह्यात दि 16 जानेवारी 2021 पासून आजतोवर एकुण 9 लाख 85 हजार नागरिकांनी लसीकरण घेतले आहे.यात 7 लाख 17 हजार नागरिकांनी पहिला डोस लसिकरण पुर्ण केले तर 2 लाख 69 हजार नागरिकांनी दुसरा डोस पुर्ण केला आहे. असा एकुण 9 लाख 85 हजार लसीकरणाचे डोसेस पुर्ण झाले आहेत.जिल्ह्यातील 40 टक्के लोकसंख्यात पहिला डोस पूर्ण झाला आहे.तर 38 टक्के लोकसंख्याने दुसरा लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे.

या पुढच्या काळात संपूर्ण जिल्हा भर आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रूग्णालयात,जिल्हा रुग्णालयात महापालिका क्षेत्र व नगर पालीका क्षेत्रात लसीकरण शिबीराचे आयोजन करुन ऑक्टोबर पर्यंत 60 टक्केपेक्षा जास्त लसीकरण करण्याचा अजेंडा असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ वृत्तांत

WhatsApp
Follow by Email
error: