धुळे महानगरपालिकेत कोण होणार “महापौर” ? आज होणार विशेष महासभा…

बातमी कट्टा:- धुळे महापौर पदासाठी आज दि 17 रोजी विशेष महासभा संपन्न होणार आहे.धुळे महानगरपालिकेत भाजप पक्षाचे स्पष्ट बहुमत असले तरी जळगाव महानगरपालिकेतील दगाफटका लक्षात घेत भाजपने धुळ्यातील पक्षाच्या नगरसेवकांना दमण नेले असल्याचे सांगितले जात आहे.धुळे येथे भाजप कडून महापौर पदासाठी प्रदिप बाळासाहेब कर्पे यांना संधी देण्यात आली आहे.महापौर पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत.

धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज 74 नगरसेवकांच्या या महानगरपालिकेत पन्नास नगरसेवकांसह भाजपचा स्पष्ट बहुमताने सत्तेत आहे. असे असले तरी, जळगाव महानगरपालिकेतील दगाफटका लक्षात घेत,  भाजपने धुळ्यातील पक्षाच्या नगरसेवकांना दमण येथे नेले आहे.काही निवडक भाजप नगरसेवक सोडले तर उर्वरीत सर्व नगरसेवक ऑनलाईन पद्धतीने मतदान करणार आहेत.

महाविकासआघाडी कडून ही उमेदवार देण्यात येईल असे दिसुन येत आहे. मात्र भाजप विरोधातले हे उमेदवार शेवटपर्यंत लढा देतील? की अर्ज माघारीच्या वेळेस हार स्वीकारतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपने महापौरपदासाठी पंकजा मुंडे समर्थक प्रदीप नाना कर्पे यांना संधी दिली आहे.भाजपकडून कर्पे यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्यामुळे त्यांची महापौर पदी वर्णी लागणं हे निश्चित मानले जात आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदाची निवड प्रक्रिया संपन्न होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी भाजपच्या उमेदवाराला किती मत मिळतात याकडे संपूर्ण खानदेशचे लक्ष लागून आहे. महापौर पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: