धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पुन्हा एकदा दमदार कामगिरी,शिक्षण विभागात खळबळ,दोन लाखांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी तथा अधीक्षक विरुद्ध गुन्हा दाखल

बातमी कट्टा:- धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.चक्क दोन लाखांची लाच मागितल्याचा कारणावरून गटशिक्षणाधिकारी व वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षका विरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तक्रारदार यांचे ओम साई इन्टरप्राइझेस या नावाचे पिंपळनेर, ता. साक्री जि. धुळे येथे दुकान आहे. सदर फर्म मार्फत तक्रारदार यांनी समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे पुरवठा करणे बाबत जिल्हा परिषद शाळांमार्फत प्राप्त पुरवठा आदेशानुसार साक्री तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना अंदाजे एकुण ४०,००,०००/- रूपयांच्या बुट व पायमोजे हया वस्तु पुरवठा केल्या होत्या.

सदर अनुदान मागणीच्या फाईल जमा करून सदर वस्तुंचे बिल अदा करणेसाठी लोकसेवक महेंद्र गोपाळराव सोनवणे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, साक्री जि. धुळे तथा अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक व माध्यमिक), धुळे यांनी बुट व पायमोजे हया वस्तुंच्या बिल मागणीचे फाईल जमा करून अंदाजे एकुण ४०,००,०००/- रूपये बिलाच्या ०५ टक्क्या प्रमाणे २ लाख रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार दि.३०.०९.२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाकडे करण्यात आली होती.

सदर तक्रारीची दि.३०.०९.२०२४ रोजी व दि.०१.१०.२०२४ रोजी पडताळणी केली असता गट शिक्षण अधिकारी, महेंद्र सोनवणे यांनी तक्रारदार यांच्याकडे बुट व पायमोजे हया वस्तुंचे अंदाजे एकुण ४४,००,०००/- रूपये बिलाच्या ०५ टक्क्या प्रमाणे २,००,०००/- रूपये लाचेची मागणी केली म्हणुन त्यांच्या विरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: