नंदुरबारातील तणावाच्या घटनेनंतर काय म्हटले पोलीस अधीक्षक ? बघा व्हिडीओ व सविस्तर…

बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- नंदुरबार येथे रात्रीच्या सुमारास झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर नंदुरबार पोलीसांनी या प्रकरणी 27 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी व एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची चर्चा आहे.तात्काळ घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाल्याने दगडफेकीला वेळीच आळा बसला होता.

व्हिडीओ

नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ दोन गटात किरकोळ वाद झाले.या वादाच्या घटनेनंतर दगडफेकीला सुरुवात झाली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नंदुरबार पोलीस दाखल झाले.यावेळी दगडफेकीत एक पोलीस अधिकारी आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून २७ संशयितांना ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.

या घटनेत शासकीय कामात अडथळ्यांसह विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून नंदुरबार शहरात शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी नंदुरबार शहरात तळ ठोकून आहेत. सोशल मीडियावर कोणी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करू नये असे आव्हान पोलीसांकडून करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: