बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.या वादळी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे.आज पालकमंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी कराणार असून आमदार जयकुमार रावल यांनी देखील शिंदखेडा तालुक्यातील काही भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अचानक विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटानंतर वादळी वारासह काही भागात गारपिट झाली.या वादळ व पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आज दि ७ रोजी आमदार जयकुमार रावल यांनी शेतीच्या बांधावर पोहचत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.शिंदखेडा तालुक्यातील सुकवद तावखेडा भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या यावेळी सांगितल्या. विधानसभेत याबाबत प्रश्न मांडू असे आश्वासन आमदार जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांना दिले.