बातमी कट्टा:- पत्नी झोपेत असताना डोक्यात कुदळीने वार करत पत्नीची निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयित पतीला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.


शिंदखेडा तालुक्यातील दभाषी येथे मोहन जगदीश भील वय ३८ याने याचे दुपारी पत्नी सोनी मोहन भील वय ३४ सोबत वाद झाले.हा वाद विकोप्याला गेल्यानंतर मोहन भील याने अंगणात झोपलेल्या पत्नी सोनी भीलच्या डोक्यात कुदळीने वार करुन निर्घूण हत्या केली.

घटनेनंतर मोहन भील पसार झाला या घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, नरडाणा पोलीस ठाण्याचे एपीआय सचिन बेंद्रे, पीएसआय मनोज कुंवर, हवालदार हेमंत पाटील, नारायण गवळी यांच्यासह श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ दाखल झाले होते.

दरम्यान,मोहन जगदीश भील याचे मूळगाव शहादा तालुक्यातील मंदाणे असल्याने तो त्याच दिशेने फरार झाल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार नरडाणा पोलिसांनी शहादा पोलिसांशी संपर्क साधला. शहादा पोलिसांनीही सतर्कता दाखवत मोहन जगदीश भील याला शहादा शहरातून ताब्यात घेतले, याबाबतीत नरडाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते.
