
बातमी कट्टा:- पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गावातील तीन ज्वेलर्सचे दुकान,एक चप्पल बुटांचे दुकान व बंद घरामध्ये घरफोडी करत रस्त्यावर उभी असलेली बोलोरो गाडी चोरून नेल्याची घटना आज घडली.या चोरीत लाखो रुपयांचा एवज चोरीस गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.चोरी करणारे संशयित सी.सी.टी.व्ही कँमेरात चित्रीत झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे दि.२० फेब्रुवारी रोजी पहाटे २.५५.०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी बोराडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील न्हानाभाऊ कॉम्प्लेक्स मधील एक व बाजार पट्ट्यातील 2 दुकाने फोडून त्यातील काही रोकड व साहित्य चोरीस गेले असून गावातील एक चारचाकी बोलेरो चोरीस गेली आहे.यात बोराडी येथील एकूण ३ ज्वेलर्स दुकानात चोरी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच डॉग युनिट फिंगर प्रिन्स तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते.बोराडी येथे एकाच रात्री 3 दुकाने एका घरात घरफोडी व एम.एच.१८ AJ क्रमांकाची बोलेरो गाडी चोरी झाल्याची घटना घडली आहे.यात एकुण 1 लाख 51 हजार किंमतीचा मुद्देमालाची चोरी झाल्याची पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.चोरी करणारे संशयित सी.सी.टी.व्ही कँमेरात चित्रीत झाले असून पोलीसांकडून शोध सुरु आहेत.
