बातमी कट्टा:- बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्यात शेकडो मासे मृत अवस्थेत तरंगत असल्याचे लोकांना आढळून आले आहेत.गटारी,नाल्याचे पाणी व केमिकल युक्त दुषित पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने काहीतरी विषायी पदार्थ पाण्यात सोडल्याने मासे मृत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथील बोरी नदीवर के.टी.वेअर बंधारा बांधण्यात आला आहे.त्या बंधाऱ्यात नागरिकांना शेकडो मृत मासे पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले.घटनेची माहिती मिळताच याबाबत पोलीस व तलाठींकडून घटनास्थळी चौकशी करण्यात आली आहे.पाणी आणि मृत मासेयांचा नमुनाची तपासणी करण्यात येणार आहे.
या बोरी नदीत नाल्यासह गटारी व केमिकल युक्त पाणी सोडण्यात येते.कुठल्यातरी विषारी पदार्थ या पाण्यात मिश्रीत झाल्यामुळे हे शेकडो मासे मृत पडले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.