बातमी कट्टा,महेंद्रसिंग गिरासे:- पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच गावातील तब्बल १२ जणांना चावा घेतल्याची घटना घडली असून यातील एकाच्या चेहऱ्यावर कुत्र्याने चावा घेतल्याने चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे.जखमींवर धुळे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शिंदखेडा तालुक्यातील हातनुर गावात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः उच्छाद मांडला असून आज दि ४ रोजी संध्याकाळी हातनुर गावातील १२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेतला.यातील १२ वर्षीय विराज सयाजी जगताप याच्या चेहऱ्यावर कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.तर ईतरांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.या घटनेमुळे हातनुर गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.