
बातमी कट्टा:- विरदेल येथील शेतात गोणपाटात १५ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना घडली होती.या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरला होता.या घटनेत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस स्टेशनवर आदिवासी समाजाचा काल मोर्चा धडकला होता तर आज सकाळी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.मृत मुलीच्या कुटूंबांची अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भेट घेऊन कुटूंबांचे सांत्वन केले.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे व शिंदखेडा पोलिस प्रशासन दाखल झाले होते.
विरदेल येथे शेतात काम करणाऱ्या मजूरांना गोणपाटात मृतदेह आढळून आला होता.यानंतर शिंदखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी गोणपाट फाडून बघितले तेव्हा मुलीचा कुजलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला.हा मृतदेह बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय मुलीचा असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे दाखल केले.प्रथमदर्शनी गळा आवळून खून करण्यात आल्याचे समजले आहे.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हीर हे करीत आहेत. घटनास्थळी व परिसरात पोलिसांकडून तपास सुरु आहे.खून कोणी व का केला याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. दि १४ रोजी आदिवासी समाजाच्या वतीने शिंदखेडा पोलिस स्टेशनवर मोर्चा धडकला तात्काळ आरोपी जेरबंद केले नाही तर पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.मोर्चा संपल्यानंतर परतत सतांना काही अज्ञातांनी अचानक बस दगडफेक केली यात दोन मुले जखमी झाले.या प्रकरणी देखील बस चालकाने पोलिस स्टेशनात नोंद केली.
आज दि १५ रोजी सकाळी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विरदेल येथे घटनास्थळी भेट दिली यावेळी मोठया प्रमाणात फौजफाटा विरदेल येथे दाखल झाला होता. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनेची चौकशी केली.या खूनात मृत मुलीच्या कुटूंबाची पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भेट घेतली कुटूंबानचे सांत्वन केले.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे व शिंदखेडा पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.या घटनेतील आरोपी पोलिसांच्या हाती अद्याप लागला नसल्याने पोलिसांकडून रात्रंदिवस या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.खून करुन गोणपाटात मृतदेह टाकून तो शेतात फेकल्याची इतकी क्रुरता कोणी व का केली असावी याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
