
बातमी कट्टा:- व्यापारीने ट्रान्सपोर्टने पाठवलेला 9 लाख 36 हजार किंमतीच्या गव्हाची अपघात दाखवून परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या ट्रान्सपोर्ट मालक,वाहन मालक व चालक तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरपूर तालुका पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

दि 29 मार्च रोजी सेंधवा मध्यप्रदेश येथील यश अनिल गोयल वय 31 वर्षे व्यवसाय व्यापार यांनी त्यांचे गुरुकृपा अग्रोटेक कंपनीमार्फत 31, 220 किलो वजनाचा घेतलेला गहु ट्रान्सपोर्टर पवन जगदिश कुमरावत यांचे शिवकृपा रोडलाईन्स ट्रान्सपोर्ट मार्फत सेंधवा येथुन सनसवाडी, पुणे येथे पोहचवण्यासाठी दिला होता. पवन कुमरावत यांनी आकाश बाविस्कर याचे मालकीचे ट्रक क्रमांक एम.एच.18 BG 8833 मध्ये सदर गहु भरुन वाहन चालक राहुल जामरे याला पाठविले होते. त्यानंतर दिनांक 02 एप्रिल रोजी पहाटे 06.30 वा. महाराष्ट्रातील दहिवद गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर सदर ट्रकचा अपघात होवुन वाहनातील गव्हाचे पोते चोरी झाल्याचे ट्रान्सपोर्टर, वाहन मालक, वाहन चालक यांनी यश गोयल यांना कळविले होते. त्यानंतर मागील 15 दिवस गोयल यांनी वेळोवेळी वरील तिन्ही व्यक्तींशी संपर्क साधुन त्यांचा गहु नक्की कोठे आहे बाबत विचारणा केली असता त्यांनी सर्व गहु रस्त्यावर वाहनाचा अपघात झाल्यानंतर लोकांनी चोरुन नेला असे सांगितले होते. परंतु वरील तिघांचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने अनिल गोयल यांनी दिनांक 16 मार्च रोजी शिरपुर तालुका पोलीस ठाणे येथे 9 लाख 36 हजार 600 रुपये किंमतीचा 574 पांढ-या गोण्यामध्ये भरलेला 31,220 किलो गहु वरील तिघांनी इतर लोकांच्या मदतीने चोरुन नेले बाबत तक्रार दिली होती. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक, जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवद बीट व डी.बी. पथकाचे अंमलदार करत असतांना त्यांनी संशयित 1) पवन जगदिश कुमरावत (ट्रान्सपोर्टर) रा. शास्त्री नगर कॉलनी गल्ली नं. 1 सेंधवा जि. बडवानी, मध्यप्रदेश 2) आकाश प्रकाश बाविस्कर (वाहन मालक) रा. वार्ड नं.24 घर नं.118 स्कुल जवळ टॉगोर बेडी नगर पालिका सेंधवा जि. बडवानी. 3) राहुल संतोष जामरे (वाहन चालक) रा. बोबलवाडी ता. राजपुर जि. बडवानी मध्यप्रदेश यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता वरील तिघांनी संगनमताने गव्हाची चोरी केल्याची कबुली दिली आहे. तिन्ही आरोपींना दिनांक 17 एप्रिल रोजी 02.00 वाजता अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
सदर कारवाई श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक, धुळे, किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे,. सुनिल गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनिल वसावे, पोहेकॉ संतोष पाटील, पोकॉ योगेश मोरे, पोकॉ संजय भोई, पोकॉ भुषण पाटील, पोहेकॉ चत्तरसिंग खसावद, पोहेकॉ सागर ठाकुर, पोहेकॉ राजु ढिसले, पोहेकॉ संदीप ठाकरे, पोकॉ कृष्णा पावरा, चापोकॉ मनोज पाटील अशांनी केली आहे.
