
बातमी कट्टा:- मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील टोळीचा डाव शिरपूर शहर पोलिसांनी उधडत पोलीसाशी सिनेस्टाईल पाठलाग करीत गावठी पिस्टल व दरोडा टाकण्याचे साहित्यासह एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.तर चार संशयित फरार झाले आहेत.
शिरपुर शहर पोलीस 23 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना अरिहंत कॉलनी परिसरातून शहादा रोडकडे दोन मोटारसायकलीवरून पाच जण संशयितरित्या फिरतांना त्यांना आढळून आल्याने पोलीसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दुचाकींसह चोपडा फाट्याकडे पळ काढल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला.यावेळी कळमसरे पुलावर एका दुचाकीला पोलिसांनी अडवल्याने मागे बसलेला एक संशयित दरोड्याचे साहित्य फेकत फरार झाला तर दुसरी विना नंबरची पल्सर मोटारसायकलचा पाठलाग केला मात्र अधांराचा फायदा घेत पसार होण्यास संशयित यशस्वी झाले. या कारवाईत शेरसिंग त्रिलोसिंग चव्हाण वय 18 रा.उमरटी ता.वरला जिल्हा बडवाणी मध्यप्रदेश यास ताब्यात घेण्यात आले त्याच्या अंगझडतीत 25 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल रिकाम्या मॅगझीन,30 हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी,स्क्रु ड्रायव्हर व लोखंडी टॉमी, मिरची पुळ असे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतले.याप्रकरणी शेरसिंग त्रिलोकसिंग चव्हाण व फरार संशयित बादशाह उर्फ सुरेंद्रसिंग प्रितमसिंग बरनाला, परबतसींग धरमसींग बरनाला, राजासींग आझादसोंग भोन्ड, राजपालसिंग ज्योतसोंग भोन्ड सर्व रा.उमरटी ता.वरला जि. बडवाणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रभारी प्रशांत बच्छाव,उपविभागीय अधिकारी अनिल माने,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख,सा.पोलीस निरीक्षक गणेश फड, पीएसआय किरणं बा-हे,संदिप मुरकुटे,पोहेकॉ ललित पाटील,लादूराम चौधरी,पोना तुकाराम गवळी पोकॉ मुकेश पावरा, विनोद आखडमल,प्रविण गोसावी,गोविंद कोळी,मुकेश पावरा,मनोज दाभाडे,स्वप्नील बांगर,अमित रणमळे,नरेंद्र शिंदे,प्रशांत पवार,रविंद्र महाले आदींनी कारवाई आहे.