प्रेमीयुगल तापीत आत्महत्या प्रकरण…! “त्या” प्रकरणी तरुणी विरुध्द गुन्हा दाखल…!

बातमी कट्टा:- तालुक्यातील सावळदे लगत असलेल्या तापी नदीपुलावरून उडी घेत आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात नाशिक येथील एका 21 वर्षीय तरूणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज साठे यांनी शनिवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे.


शनिवारी सकाळी प्रेमसंबंधातून नाशिक येथील 21 वर्षीय विवाहितेने आपल्या प्रियकरासोबत आत्महत्या करण्यासाठी तालुक्यातील सावळदे येथील तापी नदी पुलावरून नदी पात्रात सकाळी 9 वाजेच्या सुमारास उडी घेतली होती.मात्र सावळदे येथील मच्छीमारांनी तात्काळ धाव घेतल्याने सदर विवाहितेस वाचविण्यास यश आले होते.तर प्रियकर पाण्यात बुडुन मयत झाला होता.दरम्यान शहर पोलिसांनी सदर विवाहितेची चौकशी करून ताब्यात घेत शनिवारी रात्री उशिरा पोहेकॉ मनोज साठे यांनी सदर विवाहितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्याद दाखल केल्याने भादवी कलम 309 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास महिला पीएसआय छाया पाटील करीत आहे

WhatsApp
Follow by Email
error: