
बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील गणेश कॉलनीत फ्रिजचे कॉम्प्रेसर फुटून लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना दि 23 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत घरातील फ्रिज,पंखे,कुलर, टीव्ही,कपडे आणि इतर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले यात एकुण अंदाजे 3 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

शोभाबाई धर्मराज शिरसाठ(गणेश कॉलनी प्लॉट 31) यांच्या मालकिचे शिरपूर शहरातील गणेश कॉलनी परिसरात घर आहे.ते दुसऱ्या गावी वास्तव्यास आहेत तर त्या घरी त्यांचे नातेवाईक भाडेत्वावर राहतात तर मागील बाजूस कॉलेजचे विद्यार्थ्यी भाडेत्वावर राहतात.दि 23 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरातील स्वयंपाक घरातील फ्रिजच्या कॉम्प्रेशरला आग लागल्याने फ्रिजचा स्फोट झाला. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरु करत अग्निशमन दलाला माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळी जाऊन घरातील सिलिंडर बाहेर काढले.या घटनेत जीवितहानी झाली नाही.
व्हिडीओ साठी क्लिक करा https://youtu.be/YlcVwAXBsJo
स्फोटनंतर घरात आगीने भडका घेतला यात एकुण सहा रुम पैकी तीन रुममधील फ्रिज, पंखे, कुलर, टीव्ही,कपडे आणि इतर संसार उपयोगी साहित्य व महत्वाचे कागपत्रे जळून खाक झाले आहे.अग्निशमनच्या दोन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आली होती.
