बातमी कट्टा न्युज पोर्टल बद्दल काय म्हटले Abp माझा न्युजचे धुळे प्रतिनिधी….

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल झाले असून नवनवीन आव्हान दररोज समोर उभी राहत आहेत. ही आव्हानं पेलणारी एक सक्षम पिढी तयार होणे अत्यंत गरजेचे असून यातून या देशाला या राष्ट्राला उत्तम संशोधक मिळणार आहेत, विविध क्षेत्रातील बदल हे स्वागताहार्य असले तरी ते बदल स्वीकारणारी पिढी देखील तयार होणे अत्यंत गरजेचे आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून प्रसार माध्यमांच्या क्षेत्राकडे पाहिले जाते, रेडिओ वर्तमानपत्र वृत्तवाहिनी इथपर्यंत मर्यादित असलेली प्रसार माध्यमे आता डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचली आहे, सर्वात वेगवान प्रसार माध्यम म्हणून डिजिटल मीडियाकडे सध्या पाहिले जाते. या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असून यासाठी आता स्वतंत्र माध्यम देखील मोठ्या प्रमाणावर तयार झाले आहेत, मात्र मोठ्या शहरात डिजिटल मीडियाचे प्रस्थ एकीकडे मोठ्या प्रमाणावर वाढत असताना ग्रामीण भागात मात्र हा डिजिटल मीडिया नेमकं काम करणार तरी कसा असा प्रश्न माध्यमिक क्षेत्रातील अनेकांपुढे कायमच उभा राहतो मात्र याला बातमी कट्टासारख्या डिजिटल मीडियाने सणसणीत उत्तर दिले असून सध्या बातमी कट्ट्याच्या माध्यमातून जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील मोठ्यात मोठी बातमी सर्वात वेगवान आणि अचूक पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचत आहे… यामुळे अत्यंत कमी कालावधीत घडणारी घटना वाचकांपर्यंत पोहोच त्याचा फायदा होत आहे.. निर्भीड आणि निपक्षपाती पत्रकारिता संपल्याच्या अनेक चर्चा मोठ्या प्रमाणावर ऐकावयास मिळतात मात्र बातमी कट्ट्याच्या हीच निर्भीड आणि निपक्षपाती पत्रकारिता आजही सातत्याने सुरू असल्याचे पाहून पत्रकारिता हा व्यवसाय नसून ती तपश्चर्य असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाल्याशिवाय राहत नाही, आज बातमी कट्ट्याचा तिसरा वर्धापन दिन साजरा होत असताना ही पत्रकारितेची आणि लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची पालखी अशीच सक्षमपणे सुरू राहो याच मनःपूर्वक शुभेच्छा

धनंजय दिक्षीत (Abp माझा धुळे जिल्हा प्रतिनिधी)

WhatsApp
Follow by Email
error: