
बातमी कट्टा :- तालुक्यातील बोरगांव येथे उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या प्रयत्नांनी आमदार श्री काशिरामदादा पावरा यांच्या आमदार निधीतून रस्ता मंजूर झाला होता. ज्या रस्ताचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रगतीपथावर चालू होते.

आज रोजी स्वतः आमदार श्री काशिरामदादा पावरा यांनी रस्त्याची पाहणी केली. रस्त्यासाठी वापरण्यात येणारी खडी, सिमेंट व योग्य प्रकारे रस्त्याचे काम चालू आहे की नाही? याची खातरजमा स्वतः साईट वर जाऊन केली. चालू असलेल्या काँक्रेटिकरण रस्त्याची पाहणी केल्यानंतर आमदारांनी समाधान व्यक्त केले व रस्त्याची पुढील 10दिवस शिपाई व ग्रामस्थांनी योग्य प्रकारे देखभाल करण्याच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या.
माजी मंत्री श्री अमरिशभाई पटेल, प्रियदर्शिनी सूतगिरणी चेअरमन श्री भुपेशभाई पटेल व मा नगरसेवक श्री अशोकबापू कलाल यांच्या शिफारशीने आमदार श्री काशिराम पावरा यांच्या निधीतून बोरगांव येथे काँक्रेटिकरण रस्त्याला मंजुरी मिळाली होती.
यावेळी उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, माजी सरपंच रघुनाथ कोळी, ग्राम पंचायत सदस्य दीपक पदमसिंग राजपूत, तानकू भिल, ठेकेदार कोमल गिरासे व ग्रामस्थ उपस्थित होते.
