बोरगांव येथे ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियान

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बोरगांव येथे ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियाना अंतर्गत महिला व पुरुष ग्रामस्थांनी मेणबत्ती पेटवून जनजागृती केली.

यावेळी सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी बालविवाहाच्या दुष्परिणामांची माहिती दिली तसेच आपल्या गावात एकही बालविवाह होणार नाही यासंदर्भात सर्व ग्रामस्थांनी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

अभियानात सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, पोलीस पाटील मनोहर पाटील, माजी सरपंच रघुनाथ कोळी, सोसायटी संचालक जगतसिंग राजपूत, लोटन शंकर धनगर, भटेसिंग पौलाद राजपूत, सुकराम सोनू भिल, सुभाष न्हावी, अनिल पाटील, महिला बचत गटाच्या वैशाली मनोहर पाटील, भिमकोरबाई कोळी, प्रमिला न्हावी, भिमकोरबाई राजपूत, चांगोणी भिल, जितेंद्र मटेसिंग राजपूत, भुरा कोळी, ईश्वर भिल, रविंद्र नारायण कोळी, राहुल पिरन येशी, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उत्तम कोळी, दीपक पदमसिंग राजपूत, तानकु उखडू भिल, बापू भिल, रोहिदास न्हावी, संग्राम राजपूत, गौरव पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: