बातमी कट्टा:- तालुक्यातील बोरगाव येथे नुकतेच उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या प्रयत्नांनी गावात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.

वाडी आरोग्य केंद्रातर्गत जातोडा उपकेंद्रा मार्फत बोरगाव येथील अंगणवाडीत वाडी केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ पूनम बडगुजर, जातोडा उपकेंद्र समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ विनोद पाटील, फिरते वैद्यकीय पथकाचे अधिकारी डॉ काजल माळी यांच्या नेतृत्वाखाली गावातील 45 वर्षावरील ग्रामस्थांना कोरोना लसीकरण करण्यात आले.सोबत सिस्टर सौ श्वेता पाटील, आरोग्य सेवक वानखेडे, आशा सुपरवायझर सौ मनीषा पाटील, आशा सेविका निकिता जोशी मदतनीस म्हणून उपस्थित होते.
लसीकरण पथकामार्फत अगोदर ग्रामस्थांची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली जेणेकरून कोरोना पॉझिटिव्ह ग्रामस्थांना लसीकरण न करता पुढील उपचारासाठी पाठविता येईल. पण रॅपिड टेस्ट दरम्यान सर्वच ग्रामस्थ निगेटिव्ह आढळून आल्याने सर्वांना लसीकरणाचा लाभ घेता आला.
यावेळी उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, सरपंच काशीबाई भिल, माजी उपसरपंच नानेसिंग राजपूत, पोलीस पाटील मनोहर पाटील, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, सुभाष न्हावी, विठ्ठल कोळी, बापू जोशी, नवलसिंग राजपूत, जालिंदर न्हावी,जयराम पाटील व ग्रामस्थ स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.