बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटरने मोटरसायकलीला धडक देत मोटरसायकल चालकाला चिरडल्याची घटना घडली असून या अपघातात दोन जण गंभीर झाले आहेत.घटनेनंतर कंटेनर चालक कंटेनर सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 29 रोजी सायंकाळी शिरपूर तालुक्यातील हातेड व दुर्गुड्या येथून तीन जण मोटरसायकलीने सेंधवा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते.तेथून तिघेही परत येत असताना पळासनेर शिवारात भीलट बाबा मंदिरा जवळ सेंधवा कडून शिरपूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या युपी २१ बीएन ८३३६ क्रमांकाच्या कंटेनरने मोटरसायकलीला धडक दिली.भरधाव कंटेनरने नवलसिंग सुरसिंग पावरा वय ५० रा दुर्गड्या ता. शिरपूर यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर रावण नेवा पावरा वय.२५ व खुमसिंग मंगलसिंग पावरा वय ३५ दोघे रा हातेड ता शिरपुर हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्याने कंटेनर चालक वाहन सोडून फरार झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.