
बातमी कट्टा:- भरधाव ट्रॉला आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघाता कार मधील तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नंदुरबार तळोदा रस्त्यावर हा भीषण अपघात घडला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अनिल रामदास सोलंकी वय 34 रा.हाटमोहीदा हमु उधना,प्रशांत रमणभाई सोनवणे रा.वलसाड गुजरात,हिरालाल सुभाष पवार वय 35 रा.शहादा, विशाल शरद पवार वय 29 रा.शहादा व योगेश ऊर्फ अमृत नारायण सोनवणे वय 40 रा.शहादा हे पाच जण जी जे 15 सीजी 0723 क्रमांकाच्या कारने पथराई ता. नंदुरबार येथे नातेवाईकांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते.रात्री 12:30 वाजेच्या सुमारास तेथून ते कारने नंदुरबार कडून धमडाई येथे थात असतांना नंदुरबार ते तळोदा रस्त्यादरम्यान हॉटेल हायवेसमोर जी.जे 18 एजे 1763 क्रमांकाचा भरधाव ट्रॉला विरुध्द दिशेने जाऊन कारला धडकली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांसह नागरिकांनी धाव घेतली या अपघातात कारमधील प्रशांत सोनवणे,अनिल सोलंकी व हिरालाल पवार या तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.