
बातमी कट्टा:- बसने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त स्कूटी स्वार ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वृद्ध ठार झाला हा अपघात 19 सप्टेंबरला सकाळी सव्वा दहा ते साडेदहाच्या दरम्यान शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावरील पाटबंधारे कार्यालयाजवळ महादेव मंदिरासमोर घडला.शरद गंगाराम संधान शिवे वय 65 तरणतारण जैन मंदिराजवळ पारधीपुरा शिरपूर असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शरद संधान शिवे हे शिरपूर शहरातील एका हॅण्डलूम मध्ये पडदे शिवण्याचे काम करीत होते. ग्राहकाकडे पडदे बसवण्यासाठी स्कुटीवर जात असताना एम एच २० बिले ११९२ क्रमांकाच्याबसने त्यांना धडक दिली या अपघातात ते जागीच ठार झाले. घटनास्थळावरून शोरूम संचालक संभाजी पाटील यांनी 108 सेवेला याबाबत माहिती दिली रुग्णवाहिकेतून शरद संधानशिवे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय तपासणी त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले या घटनेची माहिती मिळताच येथील क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली प्राप्त माहितीनुसार सदर बस शिरपूर येथून मुखेड गावाकडे जाण्यासाठी निघाली होती या रस्त्यावर स्पीडब्रेकर नसल्यामुळे नेहमीच वाहने भरधाव वेगात जातात व त्यामुळे अपघात घडतात असे सांगून परिसरातील नागरिकांनी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.