
बातमी कट्टा:- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मुलाने वडीलांच्या पाटीवर धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून संशयित मुलाचा शोध घेणे सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील उमर्दा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काडाईपाणी पाडा येथे पेमा हेरा पावरा वय 65 हे पत्नीसोबत राहतात त्यांचा मुलगा सुकराम पेमा पावरा वय 51 हा त्यांच्या पत्नीसोबतच घरासमोर विभक्त राहतात.
काल दि 16 रोजी सायंकाळच्या सुमारास मुलगा सुकराम पेमा पावरा वय 51 यांची त्यांच्या पत्नी सोबत वाद सुरु होते.वाद विकोप्याला जाऊ नये म्हणुन सुकाराम पावरा यांचे वडील पेमा पावरा हे वाद सोडवण्यासाठी तेथे गेले असता सुकराम पावरा याने हात असलेले धारदार शस्त्राने वडील पेमा पावरा यांच्या पाठीवर वार करत वडीलांचा खून करुन सुकाराम घटनास्थळावरुन फरार झाले आहे.

घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने सांगवी पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल होत पेमा पावरा यांचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून सुकाराम पावरा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.