भाऊ आमदाराचे शिक्षण पण महत्वाचे आहे ना ! सांगा कुठल्या उमेदवाराचे किती शिक्षण? वाचा सविस्तर

बातमी कट्टा:- शिरपूर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे‌. निवडणुकीसाठी जे उमेदवार रिंगणात आहेत त्या उमेदावारांचे शिक्षण नेमके किती झाले आहे. याचा आढावा आपण घेणार आहोत.

शिरपूर म्हटले म्हणजे शिक्षण हा एक महत्वाचा मुद्दा नेहमी पुढे येत असतो शिरपूर तालुका जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत असतात. थोडक्यात काय तर शिरपूर तालुक्याला शिक्षण हब म्हटले जाते मात्र या शिक्षण हब म्हटल्या जाणाऱ्या शिरपूर तालुक्याच्या आमदारांचे शिक्षण हे देखील तितकेच महत्वाचे आणि गरजेचे आहे.

शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केली होती.त्यांचे ओनलाइन अर्ज निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर बघायला मिळतात.यात नमूद केल्यानुसार इच्छुक उमेदवारांचे शिक्षण किती झाले आहे बघायला मिळते. तालुक्याच्या विकासासाठी इच्छुक उमेदवारांचे तितके शिक्षण आहे का ? हा देखील महत्वाचा मुद्दा आहे.

गेल्या तीन पंचवार्षिक पासून शिरपूर तालुक्यासाठी आमदार म्हणून काशिराम पावरा हे विराजमान आहेत. आता पुन्हा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.त्यांनी अर्ज दाखल केले असून त्यावर म्हटल्या नुसार आमदार काशिराम पावरा यांचे शिक्षण ४ थी पास आहेत.काशिराम पावरा हे बिजेपीचे उमेदवार आहेत. यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देखील शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिला असून बुधा मला पावरा हे कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आहेत.त्यांचे शिक्षण ३ री असल्याचे नमूद करण्यात आले आहे.तर दोन वेळा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणारे डॉ जितेंद्र ठाकूर हे देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यांनी नमूद केल्यानुसार त्यांचे शिक्षण एम एस जनरल सर्जन उच्चशिक्षण झाले असून नमूद करण्यात आले आहे.शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूकीच्या रिंगणात सगळ्यात जास्त शिक्षण असलेल्या उमेदवारांमध्ये डॉ जितेंद्र ठाकूर यांचे शिक्षण जास्त आहे.

WhatsApp
Follow by Email
error: