भीषण अपघात,पिकअप दरीत कोसळली,तिघांचा जागिच मृत्यू


बातमी कट्टा:- नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात चांदशैली घाटात रस्ता खराब असल्याने आणि नागमोडी वळणाचा तीव्र उताराचा रस्त्यावर पिकप वाहनाचा भीषण अपघात झाला यात पिकप वाहनातील प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

धडगाव तालुक्यातील चांदशैली घाटात नागमोडी वळणावरून पिकप पलटी होऊन पिकप वाहन दरीत कोसळले असून, वाहनात असलेल्या 6 जणांपैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृतीही गंभीर आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू असून तीन जणांचे मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. जागोजागी रस्ता हा खचलेला असून नेहमीच लहान मोठे अपघात येथे होत असतात.पुढील कार्यवाही सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: