भीषण अपघात,भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत वायरमन तरुणाचा मृत्यू…

बातमी कट्टा:- शिरपूर चोपडा रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत वायरमन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि २१ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.अजितसिंग विजयसिंग राजपूत असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर चोपडा रस्त्यावर हॉटेल आकाश गार्डन जवळ दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे.अजितसिंग विजयसिंग राजपूत उर्फ विक्की हे महावितरण विभागाच्या भोरखेडा तालुका शिरपूर युनीट येथे वायरमन म्हणून होते.

आज दि २१ रोजी अजितसिंग राजपूत हे महावितरणच्या कामानिमित्त मोटरसायकलीने जात असतांना त्यांना समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रॅकटरने चिरडले.या अपघातात अजितसिंग राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला‌.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत अजितसिंग राजपूत यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती सर्वत्र पसरताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती.

मयत अजितसिंग राजपूत हे मुळ कोपर्ली ता‌.नंदुरबार येथील असून ते शिरपूर येथे वास्तव्यास होते.त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा व भाऊ असा परिवार होत.

WhatsApp
Follow by Email
error: