भीषण अपघातात पती ठार,पत्नी मुलगी जखमी…

बातमी कट्टा:- मालवाहू पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची घटना काल दि 16 रोजी घडली.दुर्दैव म्हणजे घटनास्थळी वेळेत रुग्णवाहिका पोहचली नसल्याने अर्धातास मृत व्यक्ती आणि जखमी अपघातस्थळी रस्त्यावर पडून होते.

सविस्तर माहिती अशी की दोंडाईचा- नंदुरबार रस्त्यावरील शिंदखेडा तालुक्यातील धावडे गावाजवळ दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पोल्ट्री फार्म च्या समोर नंदुरबार कडून येणारी भरधाव मालवाहू पिकअप ही पुढे चालत असलेल्या ४०७ मालवाहू गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीस्वार देवनाथ अमृत सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी वंदना देवनाथ सपकाळे, मोठी मुलगी परशनी दिगंबर अहिरे, लहान मुलगी गीता देवनाथ सपकाळे गंभीर जखमी झाले.अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. यावेळी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला मात्र अर्धातास पर्यंत रूग्णवाहीका घटनास्थळी पोहचली नाही. तोपर्यंत मृत व्यक्ती आणि जखमी रस्त्यावर पडून होते. माय लेकिंना पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले

WhatsApp
Follow by Email
error: