बातमी कट्टा:- मध्यप्रदेश येथील इंदौर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भावीकांच्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने आरटीका कार तीन ते चार वेळा पलटी होत विरूध्द दिशेच्या रस्त्यावर जाऊन पलटल्याची घटना घडली आहे.या कारमध्ये एकाच कुटुंबातील सर्व सदस्य असून सुदैवाने जिवीतहानी टळली तर फक्त चालकाला दुखापत झाली आहे.हा अपघात इतका भीषण होता की कारचा वरचा भागाचा पुर्णता चुराडा झाला आहे तर कार विरूध्द दिशेच्या रस्त्यावर उलटलेली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वर 1:30 वाजेच्या सुमारास पुणे येथील एकाच घरातील कुटुंबातील आजी आजोबा,पती पत्नी व दोन मुली एम.एच.12 आर.के 9875 क्रमांकाच्या आरटीका कारने पुणे येथून मध्यप्रदेश राज्यातील इंदौर येथे दर्शनासाठी जात असतांना सावळदे गावाजवळील हॉटेल हेरीटेज च्या समोर चालकाचा ताबा सुटल्याने आरटीका कार रस्त्यावरील डिवायडरला ठोकली जाऊन तीन ते चार वेळा पलटी होत विरुध्द दिशेच्या रस्त्यावर पलटी झाली.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी जवळील हॉटेल हेरीटेज व पेट्रोल पंप वरील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु केली. आरटीका कारचा हा अपघात ईतका भीषण होता की यात कारची वरची बाजूचा संपूर्ण पणे चुराडा झालेला होता तर कार विरुध्द दिशेला उलटी पडलेली होती.यावेळी वेळीच नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले.सुदैवाने या अपघातात चालक जखमी झाला असून ईतर कोणालाही दुखापत झालेली नाही.