बातमी कट्टा:- घरातील देवघरात लवण्यात आलेल्या दिव्याने अचानक पेट घेत संपूर्ण घरालाच आग लागल्याची घटना घडली आहे. यात संपूर्ण घरच जळून खाक झाले आहे.संसारोपयोगी साहित्यासह 4 लाखांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील चिमठाने येथील संतोषी माता मंदिर जवळ दगडू सहादु भोई यांचे मालकीचे घर आहे तेथे रत्नाबाई भीमराव लोहार हे भाडेकरु म्हणून राहत आहेत.दि 20 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास रत्नाबाई लोहार या घराच्या ओट्यावर बाहेर झोपलेले असतांना रात्री 1 वाजेच्या सुमारास घरातून अचानक धुर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी आरडाओरड केल्यानंतर जवळील नागरीकांनी आग आटोक्यात आण्ण्यासाठी प्रयत्न केला यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीचे अग्निशमन बंब घटनास्थळी बोलावून आग आटोक्यात आणली मात्र त्या वेळेत संपूर्ण घर जळून खाक झाले.घरातील टिव्ही, फ्रिज,कुलर, यासह 30 हजार रोकड,अन्नधाआन्यसह चांदीचे दागिने व संसार उपयोगी जळून खाक झाले यात अंदाजे 3 लाख 94 हजाराचे नुकसान झाले. घरातील देवाघरासमोर नेहमी प्रमाणे लावण्यात आलेल्या दिव्यामुळे संपूर्ण घरात आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत महसूल विभागाने पंचनामा केला आहे.शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आले आहे.