बातमी कट्टा:- नंदुरबार जिल्ह्यातील तीन तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.याबाबत शहादा तालुक्यातील सावळदा येथील भूकंप मापक केंद्रात 3.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
धडगाव तालुक्यातील धनाजे खुर्द परिसरात काल सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.धनाजे गावासह धडगाव तालुका लगतच्या काही परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.या परिसरात काही ठिकाणी घरातील भांडी पडली तर काही ठिकाणी घराचे छतावरील पत्रा थरथरल्याचे सांगण्यात आले आहे.आठ महिन्यांपूर्वी देखील जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता.अनेकांनी या भूकंपाचा धक्का अनुभवला आहे.भूकंपामुळे कुठेही नुकसान झालेले नाही.याबाबत सावळदा भूकंप मापक केंद्रात 3.2 रिक्टर स्केल इतक्या तिव्रतेची भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.