मका बियाणे बाबत शिरपूर कृषि अधिकाऱ्यांना निवेदन

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात पावसाचे आगमन उशीराने झाले म्हणून महिनाभर उशिरानेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीचे काम चालू केलीत.

जातोडा-बोरगाव शिवारात राजू इंद्रसिंग राजपूत, गुलाब नागो राजपूत, विक्रम सोनू धनगर, गिरधन बुधा तिरमले, जितेंद्र सुभाष राजपूत या शेतकऱ्यांनी ऍडव्हाटा 751 मका बियाण्याची पेरणी केली असता 80% मक्याची उगवण झाली नाही. म्हणून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले ज्यात म्हटले आहे की ऍडव्हाटा 751 कंपनीचे लॉट नं 00018 चे 20 पाकीट मका बियाणे पेरणी केली पण निकृष्ठ बियाण्या अभावी 80% मका बियाण्याची उगवण झाली नाही.

तालुका कृषि अधिकारी श्री अनिल निकुम यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली की उगवण न झालेल्या क्षेत्रातील नुकसानीची पाहणी करावी व ऍडव्हाटा कंपनी कडून शेतकऱ्यांना बियाणे व लागवड खर्चाचा लाभ मिळवून दयावा.

बोरगाव उपसरपंच तथा तालुका सरपंच महासंघ अध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया व शेतकरी रविंद्र भिकेसिंग राजपूत यांच्या मार्फत कृषि अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. उपसरपंच सिसोदिया यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी कृषि अधिकारी श्री अनिल निकुम यांच्यासोबत चर्चा केली.

WhatsApp
Follow by Email
error: