बातमी कट्टा:- जिवन प्रवास संपविण्यासाठी प्रेमयुगलाने सोबत तापी नदीत उडी तर घेतली मात्र त्यात तरुणाचा मृत्यू झाला मात्र तरुणीसोबत मरणाने ही साथ सोडल्याने तीला वाचवण्यात यश प्राप्त झाले आहे. काल तापी नदीत 23 वर्षीय युवकाचा मृतदेहाचा शोध सुरु असतांनाच आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास एका विवाहित प्रेमयुगलाने तापी नदीत उडी घेतली यात विवाहीत तरुणीला वाचविण्यात यश प्राप्त झाले आहे. तर सोबत उडी घेणाऱ्या तरुणाचा तीन तासानंतर मृतदेह मिळुन आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि 15 रोजी शिरपूर तालुक्यातील गरताड येथील 23 वर्षीय रुषीकेश राजेंद्र पाटील या युवकाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याचा काल पासून शोध सुरु असतांना आज सकाळी 9 वाजे दरम्यान मच्छीमार नारायण गोपीचंद कोळी,श्रीराम गोपीचंद कोळी,कैलास नारायण कोळी,उत्तम सुका सोनवणे यांना रुषीकेश पाटील याचा तापी नदीत मृतदेह हातात लागला मात्र त्याचवेळी सावळदे तापी नदी पुलावारुन एका प्रेमयुगल जोडप्याने तापी नदीत उडी घेतली.
यावेळी मच्छीमारांनी तात्काळ त्या दिशेने बोट घेऊन जात शोध केला असता त्यांना वेळेत तरुणी मिळुन आल्याने तरुणीचा जिव वाचला मात्र तरुणी सोबत उडी घेतलेल्या त्या तरुणाचा घटनेच्या तीन तासानंतर मृतदेह मिळुन आला आहे.
मच्छीमारांनी तात्काळ त्यावेळी तरुणीला तापी नदी बाहेर काढून आणले.यावेळी गरताड येथील युवकाचा मृतदेह घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सावळदे येथील उपसरपंच सचिन राजपूत यांच्याशी संपर्क साधला असतांना घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेतली.यावेळी त्या तरुणीने स्वताच नाव दर्शना येवले असे सांगितले.व संपूर्ण घटनाक्रमाची आपबित्ती दर्शना येवले हीने उपस्थितांना सांगितली.
तीने प्रथमदर्शनी दिलेल्या माहिती नुसार दर्शना येवले हीचे मालेगाव येथील माहेर असुन तीचे नाशिक येथील सासर आहे.तीचे लग्नानंतर शिंदखेडा तालुक्यातील वरुळ येथील अमोल गोटु कोतकर या तरुणाशी प्रेम संबध जुळले होते. याबाबतची दर्शना येवले यांच्या सासरच्या लोकांना माहिती मिळाली होती.तर ईकडे दर्शना येवले हिच्या आईला देखील दोघांच्या प्रेमसंबधाची माहिती मिळाली होती.काल धुळे येथे दर्शना येवले हिची आई,सासरचे नातेवाईक व प्रेमसंबध जुळलेला तरुण अमोल पोतकर धुळे येथे आला होता.तेथे दर्शना येवले हिच्या सासरच्या लोकांनी दर्शनाला सांगितले की,तुझे अमोल पोतकरशी प्रेमसंबध असणार तर तु घटस्फोट दे यासाठी दर्शना येवले हिने घटस्फोट देण्यास मान्यता दिली मात्र दर्शना येवले हिच्या आईने यास नकार दिला.हा संपूर्ण प्रकार धुळे येथून नरडाणा पोलीस स्टेशन येथे आला.यावेळी वरुळ येथील अमोल पोतकरचे नातेवाईक देखील आले होते. नरडाणा येथे वाद झाल्यानंतर दर्शना येवले व अमोल कोतकर तेथून निघून गेले.
आज सकाळी दोघेही जण तापी नदी पुलावर दाखल झाले त्यांनी तापी नदीत उडी घेऊन जिवनप्रवास संपविण्याचा निर्णय घेतला मात्र यावेळी दोघांचेही पुन्हा आत्महत्या न करता पुढील आयुष्य बाहेर कुठे तरी जाऊन जगू असा निर्णय घेतला व दोघेही जण पुन्हा शिरपूर येथे आले. मात्र शिरपूर येथे आल्यानंतर दोघांनाही पुढील आयुष्यात अनेक अडथळे निर्माण होतील यामुळे सोबत आत्महत्या करणे हाच एक विचार त्यांनी डोक्यात ठेवला व पुन्हा सकाळी 9 वाजेच्या सुमारास अमोल कोतकर व दर्शना येवले साळवदे तापी नदी पुल गाठत दोघांनीही तापी नदीत उडी घेतली असल्याची दर्शना येवले हिने प्रथमदर्शनी माहिती दिली.
घटनास्थळी थाळनेर पोलीस स्टेशनचे उमेश बोरसे यांच्यासह पथक दाखल होत घटनेची चौकशी करून दर्शना येवले हिला नरडाणा पोलीस स्टेशन येथे आणले नरडाणा पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी माने देखील उपस्थित झाले होते.तेथून ते प्ररकण शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाई सुरु आहे.
मिळालेल्या माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील वरुळ येथील अमोल पोतकर याचे शिरपूर फाट्याजवळ आशापुरी स्पेअरपार्टचे दुकान आहे. त्याचे ऑगस्ट महिन्यात पाटण येथे लग्न झाले होते. दोन ते तीनच महिने अमोल कोतकर याचे दुसऱ्या महिलेशी लग्न झाले असतांना प्रेमप्रकरणातून या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले.यात मच्छीमारांना दर्शना येवले यांना वाचविण्यात यश आले प्राप्त झाले होते. मात्र अमोल कोतकर मिळुन आला नव्हता त्याचा शोध सुरु असतांना घटनेच्या तीन तासानंतर 12 वाजेच्या सुमारास अमोल कोतकर यांचा मृतदेह तापी नदीत मिळून आला आहे.