महागाईविरोधात जनतेने रस्त्यावर उतरावे-आ.कुणाल पाटील
काँग्रेस पक्षाचे धुळ्यात आंदोलन

बातमी कट्टा:- काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य माणसाचा आवाज बुलंद करीत आला असून मोदी सरकारने वाढवलेल्या जीएसटीमुळे देशातील जनतेचे कंबरडे मोडले आहे.  मोदी सरकारने वाढवलेली महागाई आणि दडपशाही विरोधात जनतेने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी आज धुळ्यात झालेल्या काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनात केले.


      महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यव्यापी आंदोलन धुळे येथील क्यूमाईन  क्लबजवळ झाले. आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी केले. केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवर वाढलेल्या जीएसटीमुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे. केंद्र सरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा कोणताही विचार न करता घाईघाईत सुरू केलेल्या भारतीय सैन्य दलातील ‘अग्निपथ’ योजनेमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सर्व बाबींचा विरोध करण्यासाठी आज धुळ्यात धुळे जिल्हा काँग्रेस आणि  धुळे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने हे आंदोलन झाले. यावेळी बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तूंचा तसेच  रुग्णांच्या बिलावरही जीएसटी लावून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे पाप भारतीय जनता पार्टीचे मोदी सरकार करीत आहे.  काँग्रेसने सर्वसामान्य माणसाचा आवाज बुलंद केला असून महागाईविरोधात काँग्रेस कार्यकर्ता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.  देश कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे.  जीएसटी वाढवून गोरगरिबांच्या खिशातील पैसा उद्योगपतींच्या खिशात घालण्याचे काम मोदी सरकार करीत आहे.  त्यामुळे यापुढे महागाई आणि केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाही विरोधात जनतेने रस्त्यावर उतरावे असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले. आंदोलनप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी भाजपने अवलंबलेल्या चुकीच्या धोरणांवर घणाघाती प्रहार केला. यावेळी झालेल्या आंदोलनात माजी खासदार बापू चौरे, प्रदेश सचिव युवराज करनकाळ, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते साबीर खान, खरेदी-विक्रीचे चेअरमन लहू पाटील,माजी पं. स.सभापती भगवान गर्दे,संचालक डाॅ. एस.टी.पाटील, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रीतेश पाटील,साक्री तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे,पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके,ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील,डाॅ.अनिल भामरे, शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसैन, धुळे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गायत्री जयस्वाल, माजी जि. प. सदस्य साहेबराव खैरनार, डॉ. दत्ता परदेशी,ॲड.बी.डी.पाटील, माजी सभापती गुलाबराव पाटील, ज्येष्ठ नेते किर्तीमंत कौठळकर,काँग्रेसचे सोमनाथ पाटील, सरपंच अशोक राजपूत,राजेंद्र भदाणे, प्रदीप देसले,बापू खैरनार,किरण नगराळे,ज्येष्ठ नेते मुकुंद कोळवले, काँग्रेस पक्षाचे सोमनाथ पाटील, रावसाहेब पाटील,भटू महाले,युवक काँग्रेसचे राजीव पाटील, रामेश्वर चत्रे,अरुण पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप शिंदे, सुनिता साळुंके, युवक काँग्रेसचे पंकज चव्हाण, उमाकांत पाटील, सलमान मिर्झा, सुरेश बैसाणे, शिरपूर येथील अभिमान भोई, मनोहर पाटील,मोहन पाटोळे, तसेच शिंदखेडा येथील प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, आनंदा जावडेकर, माजिद खान पठाण,गोकुळसिंग राजपूत, मनीषा वाघ, माधवराव पाटील,बळीराम राठोड, हसन पठाण, वलवाडी माजी सरपंच भटू चौधरी, मुकटी माजी प.स.सदस्य छोटू चौधरी, बानुबाई शिरसाठ, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष हर्षल साळुंके,युवक काॅग्रेस तालुकाध्यक्ष हरीष पाटील,सादीक शेख,शकील अहमद, भिला सयाईस, साक्री नगरसेवक याकुब पठाण,माधवराव पाटील,शिवाजी अहिरे यांच्यासह जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन डॉ. दत्ता परदेशी यांनी केले.

WhatsApp
Follow by Email
error: