महाराष्ट्रातील पेट्रोल पंप ओलांडून चक्क गुजरात पेट्रोल पंपांवर गर्दी…

बातमी कट्टा:- महाराष्ट्रात पेट्रोलने शतक पार केल्यानंतर महाराष्ट्रातील काही जण पेट्रोल भरण्यासाठी चक्क गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावर गर्दी करत असल्याचे चित्र समोर आले आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे दर गुजरातपेक्षा अधिक असल्याने महाराष्ट्रातील वाहन धारक आता गुजरात मध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत.

महाराष्ट्र व गुजरात सीमा भागावरील काही नागरिक पेट्रोल भरण्यासाठी चक्क महाराष्ट्रातील पेट्रोलपंप ओलांडून गुजरात राज्यातील सिमेभागावर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी जात आहेत.त्याचे कारण असे आहे की,गुजरात राज्यात पेट्रोलची किंमती 93.02 पैसे इतकी आहे तर महाराष्ट्रात पेट्रोलने 101 रुपये म्हणजेच शतक पार केले आहे.

नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याचा सीमाभागात आहे नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोलचे दर,101रुपये 24 पैसे आहेत तर नंदुरबार पासून आवघ्या 12 किलोमिटर वर असलेल्या गुजरात राज्यात पेट्रोल 93.02 पैसे इतका आहे.एक लिटर पेट्रोल मागे 8 ते 9 रुपयांची तफावत आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील वाहन धारक गुजरात मध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असतात तेथून वाहनांची पेट्रोल ची टाकी फुल भरली तर 100 रुपयांची बचत होत असल्याचे वाहन धारकांकडून सांगण्यात येत आहे.

या गुजरात सिमा भागातील पेट्रोल पंपा वर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र मधून पेट्रोल खरेदी साठी गर्दी होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: