बातमी कट्टा:- फोनवर प्रेमसंबध जुळले मात्र वारंवार लग्नाचा तगादा लावत असल्याने बिहारी युवकाने बिहारी युवतीचा नंदुरबार परिसरातील बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ खून करून संपवल्याचे उघड झाले आहे. आठ दिवसांपूर्वी मुलीचा मृतदेह आढळला होता.पोलीसांनी मोठ्या शिताफीने सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे त्या संशयिताला गुजरात येथील सुरत येथून ताब्यात घेतले आहे.
दि 26 ऑगस्ट रोजी नंदुरबार जवळील बिलाडी रस्त्यावरील शेताच्या बांधवरील झाडाझुडांमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता.या मृत महिलेचा एक हात धडापासून वेगळा होता तर एका हातावर धारदार शस्त्राने वार केले होते.घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर,व नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे अधिकारींनी घटनास्थळी भेट दिली होती.
महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते मात्र तो खून कोणी केला याबाबत घटनास्थळावर कुठल्याही प्रकारचा धागादोरा हाती लागत नव्हता.या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असतांना दि 29ऑगस्ट रोजी पाचोराबारी येथील रेल्वे फाटकाजवळील कल्पेश पटेल यांच्या घरातील सी.सी.टी.व्ही फुटेजची तपासणी करण्यात आली यावेळी दि 24 ऑगस्टच्या रात्री एक तरुण व तरुणी नंदुरबारकडे जातांना दिसले.खून झालेल्या तरुणीच्या अंगावरील कपडे व सीसीटीव्हीत दिसणारे कपडे मिळते जुळते होते.तेथून पोलीसांना धागादोरा हाती लागला पाचोराबारी ते सुरत दरम्यान सर्व सी.सी.टी व्ही ची तपासणी करत पोलीसांनी दि 31 ऑगस्ट रोजी सुरत रेल्वेस्थानक बाहेरील सी.सी.टी व्ही फुटेज तपासणी केली असता त्यात प्लेटफॉर्मवर तेच तरुण-तरुणी दिसून आले.रिक्षाचालकाच्या मदतीने त्यांचा मार्गावर जात रविवारी विनयकुमार रामजनम राय रा.खमहौरी जि सिवन बिहार याला शिताफीने ताब्यात घेतले.त्याची विचारपूस केली असता त्याने खूनाची कबुली दिली.
त्याने सांगितले की,बिहार राज्यातील चमारीया चैनपूर ता.मशरक जि.छपरा येथील 24 वर्षीय तरुणी सीताकुमार भगत व संशयित विनयकुमार या दोघांचे दोन वर्षापासून प्रेयसंबंध जुळले होते.फोन वरचे प्रेम लग्नावर येऊन पोहचले होते.सीताकुमार हिने विनयकुमार याच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता.सीताकुमार दि 23 ऑगस्ट रोजी बिहार युथून सुरत आली.व लग्नाचा तगादा लावत होती मात्र विनयकुमार याने आपण विवाहित असल्याचे सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला.त्या तरुणीला पुन्हा बिहार सोडण्यासाठी ते दोघेही 24 ऑगस्टला सुरत-भुसावळ पँसेंजरने जाण्यासाठी बसले मात्र रेल्वेत वाद होत दोघेही ढेकवद येथे उतरले संशयित विनयकुमार याने आंधारचा फायदा घेत बिलाडी शिवारात रेल्वे ट्रॅकजवळ नेऊन झाडाझुडांमध्ये तरुणीचा ब्लेडने गळा चिरुन खून केल्याचे संशयित विनयकुमार याने सांगितले.