बातमी कट्टा:- भाजपाचे माजी शिरपूर तालुकाध्यक्ष यांना घरासमोरच धक्काबुक्की करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली असून राहुल रंधे यांनी याबाबत पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे.
राहुल विश्वासराव रंधे यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात दिलेल्या तक्रारीत म्हटले की,दि 19 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील दुध देअरी कॉलनी येथील अनिस पिंजारी याने राहुल रंधे यांच्या बोराडी येथील घरासमोर राहुल रंधे यांना कॉलर पकडून धक्काबुकी करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.त्याच्या भावाला राहुल रंधे यांनी मारुन टाकल्याचा संशयावरुन धक्काबुक्की करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.घटनास्थळी पोलीसांनी योग्य बंदोबस्त लावला असून परिसरात शांतता आहे.याबाबत शिरपूर तालुका पोलीसांकडून तपास सुरु आहे.घटनास्थळी सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी भेट दिली होती.