
बातमी कट्टा: एस. व्ही. के. एम. मुंबई जॉइंट प्रेसिडेंट, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त 25 ऑगस्ट 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

एस. व्ही. के. एम. संचलित आयुर्वेद रुग्णालय शिरपूर द्वारा वाढदिवसा निमीत्त आयुर्वेद निदान व चिकित्सा शिबीर 25 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत केतकीबेन मुकेशभाई पटेल, सेंट्रल लायब्ररी, करवंद नाका, आमदार कार्यालय जवळ संपन्न होणार आहे. या शिबिरात मुंबई येथील र. आ. पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयाचे अनुभवी, तज्ञ डॉक्टरद्वारे तपासणी व वैद्यकीय सल्ला देण्यात येईल. शिबीरात जुना खोकला व सर्दी, हृदयरोग लहान मुलांचे आजार, संधी विकार (संधीगत वात व आमवात), त्वचा विकार (सोरायसिस व एक्झीमा), आम्लपित्त व पचनसंस्थेचे विकार, मूळव्याध, मुतखडा व मुत्रपिंडाचे विकार, कंबरदुखी, प्रमेह, उच्च रक्तदाब, हाडांचा ठिसूळपणा, महिलांचे विकारांची चाचणी व औषधोपचार करण्यात येतील. तसेच ईसीजी, हिमोग्लोबीन, ब्लड शुगर, बी.एम.डी. (हाडांची तपासणी), एच. बी. ए. वन. सी. या चाचण्या करण्यात येतील व तपासणी नंतर मोफत आयुर्वेदीक औषधी दिली जातील. रुग्णांनी आजार संबंधी अगोदरची फाईल असल्यास सोबत आणावी. नोंदणी आमदार कार्यालय, करवंद रोड, शिरपूर येथे सुरु असून प्रथम येणाऱ्या फक्त ३०० रुग्णांची तपासणी व निदान करण्यात येणार आहे.
भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर व नारायण सेवा संस्थान उदयपूर (राजस्थान) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत अपंग (दिव्यांगजन) शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव, पोलिओ तपासणी व उपकरण वितरण शिबीर घेण्यात येत आहे. कृपया इच्छुकांनी https://sesrcp.in/yojana/camp/index.php या लिंक वर नोंदणी करावी. हे शिबिर आर. सी. पटेल मेन बिल्डिंग, ‘राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल’ शिरपूर येथे सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या शिबिरात फक्त तपासणी असून कुठलेहि साहित्य अथवा व्हिल चेअर, रुग्णांना देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
त्यानंतर भोरखेडा येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 36 सायकल वाटप तसेच वरुळ येथील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयात शासनाकडून मिळालेल्या 25 सायकलचे वितरण करण्यात येणार आहे.
भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त जाहिर विनम्र आवाहन……
भूपेशभाई पटेल यांचे नुकतेच ऑपरेशन झाले असल्यामुळे फुलहार, पुष्पगुच्छ स्विकारले जाणार नाहीत. सुरक्षित अंतरावरुन सर्वानी अभिष्टचिंतन शब्दसुमनांनीच करायचे आहे. हार, शाल, फुलासांठी वापरावयाचे पैसे आपले नांव लिहुन गुप्त पध्दतीने एका लिफापा द्वारे सत्कार पेटीत टाकावी. ती रक्कम गरजू लोकांच्या मदतीसाठी देण्यात येईल.