मित्रांसोबत अरुणावती नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेला युवक पाण्यातून बाहेर निघालाच नाही, शोधकार्य सुरु…

बातमी कट्टा:-  मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवक अरुणावती नदीपात्रातील पाण्यात बुडाल्याची घटना आज २० रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.पाण्यात शोधकार्य सुरु असून अद्याप शोध लागलेला नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दि २० ऑगस्ट रोजी शिरपूर तालुक्यातील शेमल्या गावातील युवक सुरेश पिंटाया पावरा हा शिरपूर येथे समारंभांमध्ये वाढपी म्हणून काम करतो.नेहमी प्रमाणे आज तो नेमल्या येथून शिरपूर येथे कामानिमित्त आला होता.सकाळपासून उकाडा होत असल्याने सुरेश पावरा त्याच्या इतर दहा ते पंधरा मित्रांसोबत आमोदे गावाजवळील अरुणावती नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता.यावेळी अचानक सुरेश पावरा पाण्यात बुडाला मित्रांनी त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.याबाबत माहिती पसरताच अरुवती नदीपात्रात ट्रयबल फोरमचे जिल्हाध्यक्ष मोगेश पावरा यांच्यासह नागरिक दाखल होत मदतकार्य करत पाण्यात शोध सुरु केला मात्र रात्री उशीरापर्यंत सुरेश पावरा मिळून आला नाही.सुरेश पावरा हा घरातील एकुलता एक मुलगा होत.

WhatsApp
Follow by Email
error: